Home मनोरंजन पुष्पा जिंदा है…:8 गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा...

पुष्पा जिंदा है…:8 गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार व्हिडिओ रिलीज

32
0

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळाले आहे. त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’चा खास व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. 3 मिनिटांचा हा व्हिडिओ चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. अखेर पुष्पा जिवंत आहे, हे या व्हि़डिओतून स्पष्ट झाले आहे.

सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन हा धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दाखवल्यानुसार, पुष्पा तिरुपती तुरुंगातून पळून गेला आहे. त्याला 8 गोळ्या लागल्या असल्याने तो जिवंत आहे की नाही असा संभ्रम लोकांमध्ये आहे. एक महिना त्याचा काहीच ठावठिकाणा नसतो. दरम्यान दंगली होतात, जाळपोळ होते. अखेर पुष्पा कुठे आहे? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तेवढ्यात टीव्ही चॅनलवर पुष्पाची झलक लोकांना दिसते. पुष्पा जिवंत आहे समजल्यावर लोकांचा आनंद गगनात मावेनासा होता.

पाहा खास व्हिडिओ…

दोन दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता खास प्रोमो
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा एक खास प्रोमो रिलीज करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. पुष्पा कुठे आहे? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना पडला होता. आज निर्मात्यांनी खास व्हिडिओ रिलीज करत पुष्पाच्या चाहत्यांना एक ट्रीटच दिली आहे.

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाचा जिथे शेवट झाला होता तेथूनच आता ‘पुष्पा द रुल’ची कथा सुरू होणार आहे. या चित्रपटात अल्लूसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सुकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अद्याप चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दलची माहिती समोर आलेली नाही.