खेळ

कॅनडा ओपन 2024: राजावत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत, त्रीसा-गायत्री जोडीही पुढे

भारतीय बॅडमिंटनपटू प्रियांशु राजावतने आपल्या उत्कृष्ट खेळाने कॅनडा ओपनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री, राजावतने जपानच्या ताकुमा ओबायाशीला 38 मिनिटांत 21-19, 21-11 ने सरळ सेटमध्ये पराभूत केले. राजावतने आपल्या आक्रमक आणि रणनीतिक खेळाने ओबायाशीला कोणतीही संधी दिली नाही. आता राजावत डेनमार्कच्या शीर्ष वरीयता प्राप्त अँडर्स अँटनसेनचा सामना करेल. अँटनसेन हा अत्यंत […]

खेळ

पोर्तुगाल 3-0 रिपब्लिक ऑफ आयर्लंड – क्रिस्टियानो रोनाल्डो ने केले दोन गोल, पोर्तुगालची युरो 2024 साठी दमदार तयारी

क्रिस्टियानो रोनाल्डोने दोन गोल करताना पोर्तुगालने रिपब्लिक ऑफ आयर्लंडला 3-0 ने हरवले, जे युरो 2024 आधीचे त्यांचे शेवटचे खेळ होते. ३९ वर्षीय रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर १२९ व १३० व्या गोलांची नोंद केली, ज्यामुळे पोर्तुगालच्या संघाने या सामन्यात विजय मिळवला. पोर्तुगालने संपूर्ण सामन्यात चेंडूवरील ताबा ठेवला आणि त्यांच्या विरोधकांना संधी मिळू दिली नाही. जोआओ फेलिक्सने पहिला […]

मनोरंजन

‘आस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जातात’:ए.आर.रहमान म्हणाले- पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल

दोन वेळा ऑस्करवर स्वतःचे नाव कोरणारे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ए. आर. रहमान त्यांच्या ‘जय हो’ गाण्याच्या निर्मितीबद्दल आणि ऑस्कर पुरस्कार जिंकण्याबाबत वक्तव्य केले आहे. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवण्यात आल्याचे रहमान यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यावर्षी 6 जानेवारीला हा व्हिडिओ […]

मनोरंजन

ऑस्करमध्ये भारत:65 वर्षांपूर्वी पहिला चित्रपट मदर इंडिया पाठवला होता, भानू अथैया यांनी 40 वर्षांपूर्वी दिला होता देशाला पहिला सन्मान

1983: भानू अथैया (गांधी) पहिला पुरस्कार कॉश्च्युम डिझायनर भानू अथैया यांनी जिंकला. चित्रपट “गांधी’साठी जॉन मोलोसह त्यांनी कॉश्च्युम डिझाइन केले होते. 1991: सत्यजित रे चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना ऑस्करने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.ते पुरस्कार सोहळ्याला जाऊ शकले नव्हते. 2008: स्लमडॉग मिलिअनरला 3 {चित्रपट ‘स्लमडॉग मिलिअनर’ मध्ये सर्वाेत्कृष्ट संगीत श्रेणीत एआर रहमानला पुरस्कार मिळाला होता.याचे […]

भारत

दिल्ली वर्ल्ड बुक फेअरमध्ये मोफत बायबलच्या वितरणावरून गोंधळ:निषेधार्थ घोषणाबाजी, स्टॉलवर कोणताही हिंसाचार झाला नाही : पोलिस

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळ्यात मोफत बायबल वाटपावरून गदारोळ झाला. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा बुकस्टॉल ख्रिश्चन नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन गिडियन्स इंटरनॅशनलचा होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक घोषणाबाजी करताना आणि मोफत बायबलचे वितरण थांबवण्याची मागणी करताना दिसत आहेत. त्यानंतर आंदोलक घोषणाबाजी करत तेथेच बसले. […]