मनोरंजन

‘आस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जातात’:ए.आर.रहमान म्हणाले- पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल

दोन वेळा ऑस्करवर स्वतःचे नाव कोरणारे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ए. आर. रहमान त्यांच्या ‘जय हो’ गाण्याच्या निर्मितीबद्दल आणि ऑस्कर पुरस्कार जिंकण्याबाबत वक्तव्य केले आहे. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवण्यात आल्याचे रहमान यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यावर्षी 6 जानेवारीला हा व्हिडिओ ए. आर. रहमान यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. रहमानने यांनी ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्याबद्दल संगीतकाराचे अभिनंदन करताना, ‘जय हो टू यू!’ असे म्हटले आहे.

टेक्नॉलॉजी आणि प्रयोगाने मिळवून दिले यश
एका मुलाखतीत, एल सुब्रमण्यम यांनी एआर रहमान यांना अनेक संगीतकार आणि ऑर्केस्ट्राबरोबर म्युझिक तयार करण्याची जुनी पद्धत कशी बददली हे विचारले. त्यावर रहमान म्हणाले, “हे टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे झाले आहे. याआधी एका चित्रपटासाठी फक्त आठ ट्रॅक होते, पण मी जिंगल बॅकग्राऊंडमधून आलो होतो, त्यामुळे माझ्याकडे 16 ट्रॅक होते आणि मी त्यात बरंच काही करू शकत होतो. त्या काळी ऑर्केस्ट्रा महाग होता, पण सर्व मोठी वाद्ये लहान झाली. यामुळे मला प्रयोग करायला भरपूर वेळ मिळाला.”

या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वात मोठे मोटिव्हेशन
“मला माझ्या वरिष्ठांनी प्रयोग करण्यासाठी मोठा स्कोप दिला. अर्थातच, आपल्या सर्वांना पैशांची गरज आहे पण त्यापलीकडे माझ्यात काम करण्याची जिद्द होती. पश्चिमी देश हे करत आहेत, तर मग आपण का करू शकत नाही? जर आपण त्यांचे संगीत ऐकतो, तर मग ते आपली गाणी का ऐकू शकत नाहीत? मी स्वतःला विचारतो की अजून चांगले प्रोडक्शन, चांगली गुणवत्ता, चांगले वितरण आणि मास्टरिंग कसे करता येईल आणि या गोष्टी मला अजूनही प्रेरणा देतात.”

ऑस्कर जिंकण्यासाठी योग्य चित्रपटांची निवड होणे आवश्यक – रहमान
ऑस्कर अवॉर्ड्ससाठी भारताकडून पाठवण्यात येणारे चित्रपट आणि नॉमिनेशनवर बोलताना एआर रहमान म्हणाले की, “कधीकधी मी पाहतो की आपले चित्रपट ऑस्करपर्यंत जातात, पण पुरस्कार मिळत नाहीत. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जात आहेत. आपण समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. इथे काय चालले आहे, हे पाहण्यासाठी मला पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल. आपल्या जागी राहून आपल्या पद्धतीने विचार केला पाहिजे.”