Home मनोरंजन नवाजुद्दीन-इरफान यांच्यातील वादाचे कारण उघड:इरफान खान यांच्या गर्लफ्रेंडसोबत होते नवाजुद्दीनचे अफेअर –...

नवाजुद्दीन-इरफान यांच्यातील वादाचे कारण उघड:इरफान खान यांच्या गर्लफ्रेंडसोबत होते नवाजुद्दीनचे अफेअर – भावाचा दावा

34
0

नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. दरम्यान नवाजचा भआऊ शमास सिद्दीकीनेही त्याच्यावर निशाणा साधला आहे. दिवंगत अभिनेता इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यात एका महिलेमुळे वादाची ठिणगी पडली होती, असा दावा शमास सिद्दीकीने केला आहे.

इरफान खानच्या गर्लफ्रेंडसोबत होते नवाजचे अफेअर
इरफान खआन आणि नवाजुद्दीन यांनी पान सिंह तोमर, द लंच बॉक्स, न्यूयॉर्क आणि आजा नचले या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र दोघांमध्ये वाददेखील होता. पण ही गोष्ट कधी उघडपणे समोर आली नाही. आता नवाजुद्दीनचा भाऊ शमासने त्यांच्यातील वादाचे कारण उघड केले आहे.

शमासच्या म्हणण्यानुसार, नवाज आणि इरफानमध्ये 2009 च्या सुमारास अमेरिकेत राहणाऱ्या मुलीमुळे वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला होता की लंच बॉक्स चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.

नवाजुद्दीनचा भाऊ शमासने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. शमास सांगितल्यानुसार, इरफान खान यांची गर्लफ्रेंड नवाजुद्दीनला आवडत होती. त्यामुळे नवाजुद्दीनही तिला डेट करत होता. याची बरीच चर्चाही रंगली होती.

नवाजुद्दीनमध्ये वादही झाला होता.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास म्हणाला, “इरफान खान यांच्या गर्लफ्रेंडला नवाजुद्दीन डेट करत होता. यामुळेच इरफान आणि नवाजुद्दीनमध्ये वादही झाला होता. लंच बॉक्स चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही त्यांच्यामध्ये याच गोष्टीवरुन पुन्हा वाद झाला होता. त्यामुळे शूटिंगचा संपूर्ण दिवस वाया गेला होता. लंच बॉक्समध्ये इरफान व नवाज दोघांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण नवाज व इरफानने एकमेकांच्या अनुपस्थितीतच सेटवर येऊन शूटिंग करू असे सांगितले होते.” शमासने सांगितल्यानुसार, इरफान यांची ही गर्लफ्रेंड यूएसमध्ये होती. ही 2009 ची गोष्ट असून त्यावेळी कबीर खानचा न्यूयॉर्क हा चित्रपट आला होता.

एका चित्रपटामुळे भावांमध्ये निर्माण झाला दुरावा
शमास आणि नवाजुद्दीन हे सख्खे भाऊ आहेत. शमासने दिग्दर्शित केलेल्या ‘बोले चुडियाँ’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. पण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोन्ही भावांमध्ये दुरावा निर्माण झाला. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले होते. नवाजुद्दीनने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

नवाजने नातेवाईकांना माझ्या मुलीला भेटू दिले नाही -शमास
शमास सिद्दीकी नुकतात एका मुलीचा बाबा झाला आहे. मुलीच्या जन्मानंतरही नवाज किंवा कुटुंबातील कोणीही त्याच्याशी बोलले नाही, असे त्याने सांगितले. शमास सांगतो की, नवाजने माझ्या मुलीला भेटू नका अशा स्पष्ट सूचना कुटुंबीयांना दिल्या होत्या.

नवाज जसा दिसतो तसा नाही…
शमास म्हणतो की, नवाजुद्दीन जसा जगाला दिसतो तसा नाही. तो म्हणाला, ‘नवाज आमची काळजी नक्की घेतो, पण भाऊ म्हणून त्याने आमचे करिअर घडवायला मदत केली नाही. तो आमच्यासाठी प्रॉपर्टी नक्कीच घेतो. पण लोकांच्या मनात त्याची जी प्रतिमा आहे, तसा तो नाही. तो खूप दुष्ट माणूस आहे, जो एका क्षणानंतर लोकांना सोडून देतो. आलिया आणि मी याची उदाहरणे आहोत,’ असे शमास सांगतो.

पत्नीसोबत सुरु आहे नवाजुद्दीनचा वाद
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाने 2010 मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. परंतु, आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने अभिनेत्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय नवाजुद्दीनवर बलात्काराचा आरोप करत आलियाने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.